परळीत जुगार अड्डयावर धाड; ५ लाखाचा मुद्देमाल जप्त तर ११ जण ताब्यात
परळी, दि.७: IPS डॉ. बी.धीरज कुमार यांनी परळीत (Parli) अवैध्य धंद्या विरूद्ध कारवाई मोहिमेने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. आज त्यांच्या पथकाने परळीतील भारती मठा शेजारी चालू असलेल्या जुगार अध्यावर छापा मारून ५ लाख १३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर ११ जुगारी ताब्यात घेऊन त्यांच्या विरूद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक बीड, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.बी. धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय माजलगाव येथील पथकाने आज (शुक्रवारी) दुपारी ४.१५ वाजण्याचे पोलीस स्टेशन परळी शहर हद्दीमध्ये रोहीत जितेंद्र मोदी हा परळी शहरातील भारती मठाचे परिसरामध्ये पत्र्याचे बंदीस्त खोलीमध्ये तिर्रट नावाचा जुगारचा क्लब चालवित असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उप विभागीय कार्यालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड, पोलीस जमादार अशोक नामदास, पोलीस कॉन्स्टेबल गणेश नवले, संतराम थापडे, युवराज चव्हाण, तुकाराम कानतोडे यांच्या पथकाने छापा मारला असता ११ जुगार खेळणारे आरोपी ताब्यात घेतले. त्यांचे ताब्यातुन ५ लाख १३ हजार ६० हजारचा माल जप्त करण्यात आला. रेडमध्ये मिळुन आलेल्या आरोपीतांमध्ये १) रोहीत जितेंद्र मोदीरा. राजपुत गल्ली परळी २) श्रीकृष्ण शिवाजी गुटटे रा. मांडवा सध्या रा. थर्मल कॉलणी परळी वै. ३) प्रताप आण्णासाहेब देशमुख रा. नवघन कॉलेज जवळ परळी ४) वाल्मीक बळीराम मुंडे रा. एरीगेशन कॉलणी परळी ५) उत्तम नारायण तट रा. शारदा नगर परळी ६) विकास राजाराम जाधव रा. वडार कॉलणी परळी ७) बालु रंगनाथ राठोड रा. वसंतनगर तांडा परळी ८) वैजिनाथ रंगनाथ राठोड रा. वसंतनगर तांडा ता. परळी ९) रघुनाथ विजय रॉय रा. नाथ टॉकीज जवळ नाथ रोड परळी १०) शिवराज सखाराम काळे रा. चांदापुर ता. परळी ११) शिवाजी उत्तम धोतरे रा. वडार कॉलणी परळी असे मिळुन आले असुन त्यांचे विरुध्द महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4.5 प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांचे फिर्यादी वरुन पोलीस स्टेशन परळी शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
