उद्यापासून २० एप्रिल पर्यंत माघार घेण्याचा अवधी
माजलगाव, दि.५: येथील बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तब्बल १७२ अर्ज प्राप्त झाले होते त्याची छाननी सहनिबंधक कार्यालयात आज पार पडली त्यात एकूण २१ अर्ज बाद झाले त्यामुळे १५१ अर्ज शिल्लक राहिले आहेत.

दि.३ एप्रिल रोजी बाजार समिती संचालक पदाच्या १८ जागांसाठी सेवा सहकारी संस्था मतदार संघातुन ११ जागांसाठी ९१ उमेदवारी अर्ज, व्यापारी मतदार संघातुन २ जागांसाठी २३, हमाल मापाडी मतदार संघातुन १ जागेसाठी १४, ग्रामपंचायत मतदार संघातुन ४ जागांसाठी ४४ असे एकुण १८ जागांसाठी १७२ अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जांची छाननी आज दि.५ बुधवारी येथील सहनिबंधक कार्यालयात पार पडली. त्यात १६ अर्ज हे डबल अर्ज असल्यामुळे बाद ठरले तर ५ अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद झाले. आता निवडणुकीसाठी १५१ अर्ज शिल्लक राहिले आहेत.आत्ता अर्ज माघे घेण्याची अवधी उद्या दि.६ एप्रिल ते २० एप्रिल २०२३ पर्यंत आहे.
