माजलगाव, दि.२७: येथील व्यापारी तथा भाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ हल्ला प्रकरणी आमदार प्रकाश सोळंके यांच्या पी. ए. महादेव सोळंके काल अटक करण्यात आली होती. आज माजलगाव पोलीसांनी माजलगाव न्यायालयात हजर केले असता महादेव सोळंके यास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

माजलगाव शहरातील व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर धुळीवंदना दिवशी प्राणघातक हल्ला केला होता. त्यात शेजुळ यांनी हा हल्ला आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून झाला असल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार आ.प्रकाश सोळंक, त्यांची पत्नी मंगल प्रकाश सोळंके, रामेश्वर टवाणी यांच्यासह ५ ते ६ जनाविरुद्ध 307 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे. याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केला असता आमदार प्रकाश सोळंके यांचे पी.ए. महादेव सोळंके यांचा सहभाग आढळल्याने त्यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. आज दि.२९ बुधवारी दुपारी ३ वाजता माजलगाव न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.एन.सावंत यांनी महादेव सोळंके यास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली.
या प्रकरणातील तपासात आणखी पुढे कोण कोण हल्ला करण्यात सहभागी होते. याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
