होळी व धुलीवंदन शांततेत व आनंदात साजरे करा; ठाणेप्रमुख बल्लाळ यांचे आवाहन
माजलगाव, दि.६: होळी व धुळीवंदन हे सण सर्वांनी शांततेत व आमदार साजरे करावे. कुणाला ही त्रास होईल, कुणाच्या भावना दुखावतील असे गैर कृत्य करू नये, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल. असा इशारा माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख शितलकुमार बल्लाळ यांनी दिला आहे.
होळी व धुलीवंदन सण सर्व समाज बांधव मोठ्या उत्साहात साजरे करतात. हाच आनंद व उत्साह अधिक रहावा, याकरिता पोलीस प्रशासनाने बंदोबस्त तैनात आहे. परंतु काही समाजकंटक कडून हा सण विपरीत पद्धतीने साजरा केला जातो. त्यात शरीरास अपायकारक रंग बळजबरीने लावणे, दारू पिऊन दुचाकी भरघाव वेगात चालवणे. दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करताना आढलून येणे. तसेच बेकायदेशीर दारू विक्री करताना आढल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वाहने नियमात चालवावी, अन्यथा पोलीस प्रशासनाने स्पीड मीटर लावलेले आहेत. त्यावर आम्ही दुचाकी जप्त करून जास्तीत जास्त दंड आकारन्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी अशा पद्धतीने कुठे गैरकृत्य होत असल्यास ११२ नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ केले आहे.