- संजय राऊतांच्या बेताल वक्तव्याचा माजलगाव शिवसेनेकडून निषेध
माजलगाव : माजलगाव शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख तुकाराम बापू येवले यांच्या नेतृत्वाखाली खा.श्रीकांत शिंदे यांच्यावर बेताल आरोप करणाऱ्या संजय राऊत यांच्या प्रतीकात्मक फोटो कुत्र्याला लाऊन जोडो मारो आंदोलन आज (दि.२३) दुपारी १ वाजता करण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा.श्रीकांत शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा बेताल आरोप केला आहे. राऊत हे सतत काही काही बेताल वक्तव्य करत असल्याने सटप्त होत. माजलगाव शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख तुकाराम बापू येवले यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२३ गुरुवारी १ वाजता संजय राऊत यांचे प्रतीकात्मक फोटो कुत्र्याला लाऊन जोडी मारी आदोलान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख पापा सोळंके, सूनीलराव खंडागळे, विनोद कुल्थे, माऊली कदम, अशोक डोने, विलास नेमाने, वैजनाथ चव्हाण, विनायक सोनटक्के, सुधीर कुलकर्णी, किशोर झिंजुरके आदी शिवसैनिक उपस्थित होते.
