१२ वी चा पेपर फोडणाऱ्या शिक्षकांना अटक

Spread the love

१२ वी च्या परीक्षा कॉपी मुक्त करण्याची जवाबदारी असणाऱ्या शिक्षकांनीच पेपर फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानुसार परभणी येथील सहा शिक्षकांना अटक करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

राज्यात १२ वीच्या परीक्षेला १४ लाख ५७ हजार विध्यार्थी बसले आहे. या परीक्षा पारदर्शक पने कॉपीमुक्त पार पडणे गरजेचे आहे. मात्र, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणाऱ्या या परीक्षे बाबत परभणीतून धक्का दायक प्रकार समोर आला आहे. परीक्षा केंद्र असलेल्या महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनीच इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार केल्याचे उघडकीस आले आहे. इंग्रजीचा पेपर अकरा वाजता देण्यात आला. हा पेपर देताच दोन शिक्षकांनी त्याचा फोटो काढून व्हॉट्सअपद्वारे इतर शिक्षकांना पाठवला. हे शिक्षक महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या एका खोलीत बसून त्याची विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करत होते. ही बाब समजताच सोनपेठ पोलीस ठाण्याच्या एका पथकाने त्यांना पकडले.

या प्रकरणी रात्री उशिरा उपकेंद्र संचालक कालिदास कुलकर्णी, इंग्रजी शिक्षक बालाजी बुलबुले, जिजामाता विद्यालयाचा शिक्षक गणेश जयतपाल, शिक्षकरमेश मारोती शिंदे, शिक्षक सिद्धार्थ सोनाळे, शिक्षक भास्कर तिरमले या जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.

Leave a Reply