राऊतांचे गृहमंत्री फडणवीसांना पत्र
माजलगाव : राज्यात सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा.श्रीकांत शिंदे यांनी दिली असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त, ठाण्याचे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहाले आहे. त्यात त्यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा.श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत. त्यांनी आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी गुंडाना सुपारी दिल्याचा आरोप केला आहे.