माजलगाव वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. सुतळे तर सचिवपदी ॲड.कुलकर्णी

Spread the love

– उपाध्यक्षपदासाठी २० एप्रिलला मतदान

माजलगाव : माजलगाव वकील संघाच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला होता. आज बुधवारी (दि.१५) झालेल्या वकील संघाच्या पदाधिकारी निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲड.सचिन सुतळे तर सचिवपदी ॲड.पी.के.कुलकर्णी यांची बिनविरोध निवड आज जाहीर करण्यात आली.

माजलगाव वकील संघाचा कार्यकाळ संपल्याने नवीन कार्यकारिणी करिता निवडणूक प्रक्रिया पार पडली. आज दि.१५ बुधवारी अर्ज वापस घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी अध्यक्षपदासाठी ॲड.सचिन ए. सुतळे, सचिव पदासाठी ॲड.पी.के.कुलकर्णी, कोषाध्यक्ष पदासाठी ॲड. टी.पी. रेडे, सहसचिव पदाकरीता ॲड.श्रीमती एस.एन.उजगरे यांचे एकमेव अर्ज राहिल्याने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आल्या. तर उपाध्यक्ष पदासाठी ॲड.एस एस.मुंडे व ॲड.ए.व्ही. डोंगरे हे दोन अर्ज राहिले आहेत. त्यामुळे केवळ उपाध्यक्ष पदासाठी दि.२० एप्रिल २०२३ रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. एस.सी.शर्मा तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी ॲड. टी. एन.कोल्हे, ॲड. ए. डी. होरमाळे यांनी काम पाहिले.

Leave a Reply