पुण्यात आयकर विभागाने आज (बुधवारी) आठ ठिकाणी जवळपास धाडी टाकल्या आहेत. यात पुण्यातील बडे उद्योजक असलेले सिटी ग्रुपचे चेअरमन आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे यांच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकला आहे. देशपांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकवर्तीय म्हणून परिचित आहेत.

अनिरुद्ध देशपांडे पुण्यातील मोठे बांधकाम व्यवसायिक आहेत. पुण्यातील त्यांच्या घरासह जवळपास विविध ८ ठिकाणी आयकर विभागाने आज दि.१५ बुधवारी पहाटेपासून अधिकाऱ्यांनी धाड टाकेली आहे. यात देशपांडे यांचे घर आणि कार्यालयाची झाडाझडती सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अनिरुद्ध देशपांडे हे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
