बीड : बीडचे जिल्हाधिकारी रधाबिनोद शर्मा यांची आज (मंगळवारी) बदली झाली असून त्यांच्या जागी दिपा मुधोळ – मुंडे नव्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. जिल्ह्याला प्रथमच महिला जिल्हाधिकारी मिळाल्या आहेत.अशी सूत्रांची माहिती आहे.

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या बदलीच्या चर्चा अनेक दिवसांपासून होती. अखेर आज (दि.१४) मंगळवारी त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर दीपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दीपा मुधोळ- मुंडे या २०११ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. मुधोळ मुंडे यांच्या रूपाने महिला जिल्हाधिकारी जिल्ह्याला मिळाल्या आहेत. यापूर्वी त्यांनी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे.

