माजलगावचा मल्ल सुमितकुमारने सुवर्ण पदक पटकावले !

Spread the love

खेलो इंडिया युवा स्पर्धेत केले महाराष्ट्राचे नेतृत्व

माजलगाव : मध्यप्रदेशमध्ये खेलो इंडिया युवा स्पर्धेत ७१ किलो वजन गटात ग्रिको रोमन कुस्ती प्रकारात महाराष्ट्राचे नेतृत्व करत असलेल्या माजलगावच्या सुमितकुमार अप्पासाहेब भारस्कर यांनी सुवर्ण पदक मिळून यश संपादन केले आहे. त्याने शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाबचा मल्ल मनजोत सिंग यांचा ११-७ असा पराभव केला. त्याच्या यशाबद्दल माजलगावसह जिल्हा भरातील कुस्ती प्रेमितून कौतुक होत आहे.

सुमित कुमारने कशी केली स्पर्तिस्पर्ध्यावर मात .. पहा

सुमितकुमार हा माजलगाव शहराला लागून असलेल्या पुनर्वसित शेलापूरी येथील रहिवाशी आहे. तो सर्वसामान्य कुटुंबातील असून वडील अप्पासाहेब भारस्कर हे ऊसतोड मजूर आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्याला सर्वोतकृष्ट मल्ल बनवण्याचे स्वप्न त्याच्या वडिलाचे आहे, त्यानुसार तो खरे ठरत आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व करताना ठाणे मध्यप्रदेशमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत ७१ किलो वजन गटातून ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात सुमितकुमार भारस्कर याने पंजाबच्या मनजोत सिंग याच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत ११-७ असा पराभव केला. सुमितकुमारच्या रूपाने महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळालेच, मात्र माजलगावच्या मातीतील युवकाने हे यश संपादन केल्याने स्थानिक कुस्ती पटूसह नागरिकांतून कौतुक व्यक्त होत आहे.

सुमितकुमार देतो प्रशिक्षक व पालकांना श्रेय …

अंतिम लढतीनंतर सुमितकुमार भारस्कर म्हणाला, “सुवर्णपदक जिंकण्याबाबत आशावादी होतो, मात्र येथे आव्हान खूप तगडे होते. तरीही मी शेवटपर्यंत चिकाटी व संयम ठेवला त्यामुळेच मला यश मिळविता आले. या सुवर्णपदकाचे यश माझ्या सर्व प्रशिक्षकांना आणि पालकांना द्यावे लागेल”.

Leave a Reply