शिव जन्मोत्सव समितीकडून माजलगावात सर्वधर्मीय विवाह सोहळा !

Spread the love

गरजवंतानी विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणी करावी – अध्यक्ष बाळू ताकट

माजलगाव, दि.४(प्रतिनिधी) : माजलगाव शहरात प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी शिवजयंती निमित्त सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातच यंदाचे वर्ष शिवराज्याभिषेकाचे 350 वे वर्ष आहे. त्यामुळे या दुग्धशर्करा योगाच्या निमित्ताने यंदा अनोख्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी राहणार आहे. तरी गरजवंत वधु – वर यांच्या पालकांनी विवाह सोहळ्या साठी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी, असे आवाहन शिव जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बाळु ताकट यांनी केले आहे.

समाजाप्रती आपले काही देणे लागते, या सामाजिक भावनेने बाळू ताकट या तरुनाणे माजलगाव शहरात सर्वधर्मी सामूहिक विवाह सोहळे सुरू केले आहेत. एक वर्षाचा अपवाद वगळता ही परंपरा कायम सुरू आहे. यंदाच्या वर्षीही मोठ्या थाटात विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुग्धशर्करा योग म्हणजे यंदा शिवराज्याभिषेकाचे 350 वर्ष आहे. यानिमित्ताने शहरवासीयांना अनोख्या कार्यक्रमाची मेजवानी अनुभवन्यास मिळणार आहे.
यावर्षी शिव जन्मोत्सवा नेहमीचे शंभर लोकांचे ढोल पथक, देखावे, अनेक बँड पथक, हलकी पथक, नगारा वादन, भगवा झेंडा पथक यासह चित्त थरारक प्रात्यक्षिकेसह अनोखे आणि माजलगावकरांनी कधिही न पाहिलेले अदभुत देखावे मिरवणुकीत सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या या शिवजन्मोत्सवा निमित्तच्या विवाह सोहळ्यात पात्र वधू-वरांची नाव नोंदणी करावी,असे आवाहन शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बाळू ताकट यांच्यासह प्रशांत होके, राहुल मुगदिया, बल्ली(विष्णु)होके, प्रसाद सावंत, सचिन सुरवसे यांनी केले आहे.

मिरवणूक ही ठरणार आकर्षण मेजवानी

गतवर्षी साजरा करण्यात आलेल्या विवाह सोहळ्यात अनेक आकर्षक देखावे सादर करण्यात आले होते. बाहुबली हनुमाच्या देखावे लहान थोरांसह चिमुकल्यांची मने जींकली होती.यंदाचे वर्ष शिवराज्याभिषेकाचे 350 वे वर्ष आहे. हा दुग्धशर्करा योगानिमित्त मिरवणूक भव्य व सांस्कृतिक देखाव्यातुन शहरवाशीयांचे डोळ्याचे पारणे फेडणार असल्याचा मनोदय समितीचे अध्यक्ष बाळु ताकट यांनी व्यक्त केला.

Leave a Reply