IAS आदित्य जिवने माजलगाव नगर पालिकेस मुख्याधिकारी म्हणून रुजू

Spread the love

माजलगाव, दि.१०: येथील नगर पालिकेला मुख्याधिकारी म्हणून IAS आदित्य चंद्रभान जिवने हे आज (सोमवारी) रुजू झाले आहेत. जिवने यांचा सध्या परिविक्षाधीन कालावधी असून ५ आठवडे पालिकेचा कारभार ते पाहणार आहेत. 

माजलगाव पालिकेचा कारभार या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतो. त्यात विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांचे माजलगाव शहरावर विशेष लक्ष राहते. मागील दोन वर्षापूर्वी प्रशिक्षण कालावधी काळात IAS विवेक जॉनसन यांना मुख्याधिकारी म्हणून पाठवले होते. जॉनसन यांनी प्रशिक्षण काळात पालिकेतील झालेल्या भ्रष्ट कारभारावर कारवाई करण्याकरिता पाऊले उचलली होती. त्यानुसार तीन मुख्याधिकारी, पालिकेचा पदाधिकारी, कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करून जेलवारी घडवली होती. यातून कुणीच काही एक शिक घेतली नाही. पुढे ही पालिकेत भ्रष्टाचाराची मालिका चालूच राहिली. त्याबाबत विशेष लेखापरीक्षण लागलेले आहे. यावर आत्ता विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी परत एकदा IAS आदित्य जिवने हे प्रशिक्षणार्थी कालावधीत असताना त्यांची माजलगाव नगर पालिकेत दिनांक १०/०४/२०२३ ते १२/०५/२०२३ (५ आठवडे) या कालावधीत मुख्याधिकारी पाठवले. त्यानुसार ते आज दि.१० सोमवारी दुपारी ४ वाजता पालिका कार्यालयात उपस्थित राहून पदभार स्वीकारून कामाला लागले आहेत. आत्ता जिवने कशा पद्धतीने भ्रष्ट कारभार समोर आणून कारवाई करतात. याकडे शहरवासीयांचे लक्ष आहे.

IAS आदित्य जिवने यांनी पदभार स्वीकारताच पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक गणेश डोंगरे, सुधाकर उजगरे, अक्षय धारक आदी कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.

Leave a Reply