सोळंकेच्या शिवपार्वती कारखान्यावर ईडी व सीबीआयची छापेमारी

Spread the love

धारूर, दि.३०: धारूर तालुक्यातील पांडुरंग सोळंके यांनी स्थापन केलेल्या शिव पार्वती साखर कारखान्यावर व सोळंके यांच्या निवस्थास्थानी इडी (ED) व  (CBI) सीबीआयने आज (गुरुवारी) पहाटेपासून छापेमारी केली. इडी व सीबीआयच्या छापेमारीमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्यांची उसासाठी इतर कारखान्याकडून होत असलेलीअडवणूक दूर करण्यासाठी संस्थापक पांडुरंग सोळंके यांनी शिवपार्वती साखर कारखाना उभारणीचे काम २०१० साली हाती घेतले होते. त्यानंतर संस्थापक असणाऱ्या पांडुरंग सोळंके यांना बाजूला सारत नंदकुमार तासगावकर, राजेश तासगावकर यांनी बनावट कागदपत्रे बनवून स्वतःच्या नावे कारखाना करून घेतला. कारखान्यावर तासगावकर यांनी २०१३ साली १०६ कोटी रुपयांचे कर्ज पंजाब नॅशनल बँक व इतर बँकांकडून घेतले. मात्र पुढे हा कारखाना अर्धवट उभा करून तासगावकर यांनी सोडला. परिणामी कारखाना दिवाळखोरीत गेला. त्यात कारखान्याचे प्रकरण कोर्टात गेलेले असून प्रलंबीत असतानाच बँकांनी कारखाना लिलावात काढला आहे. त्यातच कमी की काय म्हणून आज दि.३० गुरुवारी पहाटेपासून शिवपार्वती कारखाना स्थळावर व कारखान्याचे संस्थापक असलेले पांडुरंग सोळंके यांच्या दिंद्रुड येथील निवासस्थानी इडी (ED) व  (CBI) सीबीआय कडून छापेमारी करण्यात आली. यामुळे मात्र इडी (ED) व  (CBI) सीबीआयच्या छापेमारीमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

इडी व सीबीआयला चौकशीस सहकार्य करू  

इडी (ED) व  (CBI) सीबीआयच्या छापेमारी झाली असल्याचे मला माझ्या मुलाकडून कळाले आहे. एवढेच नव्हे तर त्या अधिकाऱ्यांशी माझे फोनवरून बोलणे झाले आहे. मी छत्रपती संभाजी नगर येथे असल्यामुळे त्यांना मला येण्यास वेळ लागेल मी आपणास चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे झटपट बातमी कडे प्रतिक्रिया देताना शिवपार्वती कारखान्याचे संस्थापक पांडुरंग सोळंके यांनी सागितले.

 

Leave a Reply