आरोप प्रत्यारोपाने मतदार संघातील राजकारण तापले
माजलगाव, दि.१०: शहरातील व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष व भाजपचे कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भरदिवसा प्राणघातक हल्ला केला. हल्ला स्थळी असलेल्या नागरिकांनी बचावासाठी धाव घेतल्याने सुदैवाने ते यातून बचावले. या घटनेला तीन दिवस उलटले असताना ही अध्याप पोलीसांना त्या हल्लेखोरांचा तपास लागलेला नाही. त्यात माजलगाव चे स्थानिक राजकारण मात्र तापले आहे.
अशोक शेजुळ हल्ला प्रकरणी (मंगळवारी) दि.७ रोजी याप्रकरणी आमदार प्रकाश सोळंके सह त्यांच्या पत्नीवर ३०७ गुन्हा दाखल झाला. त्यातून आ.सोळंके सह पत्नी यांना अंतरिम जामीन मिळाला. त्यावर आ.सोळंके यांच्या पत्नी व पुतणे जयसिंग सोळंके ह्यांनी या हल्ल्याशी आमचा संबंध नसल्याचे जाहीर करत रमेश आडसकर यांच्यावर आम्हाला गुन्ह्यात गोवल्याचा आरोप केला. त्यात आडसकर ह्यांनी पत्रकार परिषद घेऊन मी कशाला नावे गोवू, स्वतः अशोक शेजुळ यांनीच फिर्याद दिली आहे. मात्र सोळंके हे या गंभीर घटनेत विषयाचे विषयांतर करू पाहत असल्याचे प्रतिउत्तर दिले. त्यामुळे मात्र माजलगाव मतदार संघातील राजकीय वातावरण तापले आहे.
हा हल्ला होण्याची घटना होऊन तीन दिवस उलटले असताना पोलिसांना अजून हल्लेखोरांचा तपास लागलेला नाही.याचा तात्काळ पोलीसांनी तपास लाऊन काय तो एकदाचा सोक्ष मोक्ष लावावा, अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होत आहे.
– – – – – – – – – – –
तपासाची सुत्रे एल. सी.बी.कडे
माजलगाव शहरातील अशोक शेजुळ हल्ला प्रकरणाचा तपास एल. सी.बी. कडे गेला आहे. दोन संशयीत ताब्यात घेतले असून आत्ता त्यांची यंत्रणा किती प्रभावी ठरून हल्लेखोर समोर येणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.